आरोग्य सेवेत मोलाचे योगदान - संभाजीनगरच्या ईएसआयएस रुग्णालयाचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। औद्योगिक शहर म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या ईएसआयएस रुग्णालयाच्या कार्याचा राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीतर
आरोग्य सेवेत मोलाचे योगदान - संभाजीनगरच्या ईएसआयएस रुग्णालयाचा गौरव


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

औद्योगिक शहर म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या ईएसआयएस रुग्णालयाच्या कार्याचा राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित समारंभात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, संचालक डॉ. अशोक थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद थोरात, संचालक सोहम वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील ईएसआयएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा

पाळवदे, वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. संगीता शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब बोर्डे, कार्यालयीन अधीक्षक राजकुमार रानभरे, टंकलेखक-लिपिक बालाजी नागेश्वर, कंत्राटी शल्यचिकित्सक डॉ. गजानन टारपे, अधिपरिचारिका संध्या खिल्लारी, परिचारिका स्मिता सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक पांडुरंग वडजे, कनिष्ठ लिपिक राजेश इंगळे, कक्षसेवक पंडित थोरात तसेच सफाई कामगार प्रदीप चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील ईएसआयएस रुग्णालय हे मराठवाड्यातील एकमेव १०० खाटांचे कामगार रुग्णालय असून १९९६ पासून कार्यरत आहे. या रुग्णालयाअंतर्गत मराठवाड्यात एकूण ९ सेवा दवाखाने कार्यरत आहेत. शेंद्रा एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, रांजणगाव, पैठण तसेच नांदेड येथे सेवा सुविधा उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande