लातूर - पोहरेगावात २७ वर्षानंतर भरला शेतकरी बाजार
लातूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील मौजे पोहरेगाव हे पंवक्रोशीतील सर्वात मोठे नावाजलेले गाव आहे. याठिकाणचा नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकरी बाजार अखेर २७वर्षानंतर गजबजून नेल्याचे पहावयास मिळाले. या शेतकरी बाजाराचे उद्घाटन जिल्हा ब
गाव गजबजले


लातूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील मौजे पोहरेगाव हे पंवक्रोशीतील सर्वात मोठे नावाजलेले गाव आहे. याठिकाणचा नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकरी बाजार अखेर २७वर्षानंतर गजबजून नेल्याचे पहावयास मिळाले.

या शेतकरी बाजाराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्या आशा भिसे, मनीषा कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संयुक्तीक स्वरूपात अगदी थाटामाटात संपन्न झाले. या गावाचा मागील २७ वर्षापासून आठवडी बाजार हा इतिहास जमा झाला होता. परंतु सर्जेरावजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली एड. शिरीष यादव यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय तसेंथ सेवा सहकारी सोसायटी संचलक ली. मंडळाच्या यांच्या अथक परिश्रमानंतर अखेर शेतकरी बाजारला आजपासून सुरुवात करण्यात आली. या बाजारामुळे भाजीपाला, उत्पदक, शेतकरी, कपडे, स्टेशनरी, किराणा माल व्यापारी अदींना थेट फायदा आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीला नक्कीच चालना मिळणार आहे. शिवाय सुरु झालेल्या बाजारमुळे लहान मोठ्या व्यवसायिकांना बाजाराच्या निमित्ताने नव्या रोजगाराची संधी मिळाली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande