बीड शहर पोलिसांतर्फे मोफत आरोग्य शिबिर
बीड, 09 एप्रिल (हिं.स.)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व जागतिक आरोग्य दिनानिमित्त बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील जवळीक वाढावी व सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा या
बीड शहर पोलिसांतर्फे मोफत आरोग्य शिबिर


बीड, 09 एप्रिल (हिं.स.)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व जागतिक आरोग्य दिनानिमित्त बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील जवळीक वाढावी व सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

याप्रसंगी डॉ. सुनील बोबडे यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. प्रमोद शिंदे यांनी मोबाइलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानेच्या त्रासावर मार्गदर्शन केले. डॉ. विशालॉपिंगळकर यांनी पाठीच्या आजारांवर वेळेत उपचार घेण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर की, अशा उपक्रमांमुळे पोलिस-जनता संवाद वाढण्यास मदत होते. पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले

शिबिरात ७२ गरजूंनी मोफत तपासणी व औषधांचा लाभ घेतला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक महेश जाधव पोलिस अंमलदार भागवत सानप, राजेंद्र मुंडे आणि शहंशा सय्यद यांनी परिश्रम घेतले. 'निरोगी बीड, सुरक्षित बीड' असा संदेश देत पोलिसांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande