सोयगाव पं.स.च्या सर्वसाधारण सभेत प्रशासक काळातील खरेदी व्यवहारांवरून जोरदार खडाजंगी
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोयगाव पंचायत समितीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासक काळातील खरेदी व्यवहारांवरून जोरदार खडाजंगी उडाली. सभापती उत्तम चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीत, सदस्य सविता गव्हांडे यांनी तत्कालीन
सोयगाव पं.स.च्या सर्वसाधारण सभेत प्रशासक काळातील खरेदी व्यवहारांवरून जोरदार खडाजंगी


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

सोयगाव पंचायत समितीच्या

पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासक काळातील खरेदी व्यवहारांवरून जोरदार खडाजंगी उडाली. सभापती उत्तम चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीत, सदस्य सविता गव्हांडे यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या कार्यकाळातील खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली.

यावेळी सदस्य वैभवी सागर पाटील यांनी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गळक्या इमारतीचा आणि उपकेंद्रांच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडून नवीन

रुग्णवाहिकेची मागणी केली. सभापती चव्हाण यांनी रोहयोअंतर्गत २०११ ते २०२५ या काळातील विहिरी, गोठे आणि घरकुलांचा प्रलंबित निधी लाभार्थीच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे निर्देश दिले. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस उपसभापती गयाबाई घोडे, सदस्य जयश्री पवार, राहुल राठोड, गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, सहायक गटविकास अधिकारी अशोक दौड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande