एमएनजीएलचे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 500 किलोमीटरचे जाळे
पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)। व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ‘एमएनजीएल’कडे कनेक्शनसाठी धाव घेतली. त्यानंतर ‘एमएनजीएल’ने अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिथे पाइपलाइनची पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध होती त्या
mgnl


पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)। व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ‘एमएनजीएल’कडे कनेक्शनसाठी धाव घेतली. त्यानंतर ‘एमएनजीएल’ने अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिथे पाइपलाइनची पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध होती त्या ठिकाणी 40हून अधिक नवीन रेस्टॉरंटना नवीन कनेक्शन दिले आहे. तसेच ज्या भागात पाइपद्वारे गॅसची सोय नाही अशा 100 ते 125 नवीन रेस्टॉरंटना व्यावसायिक जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदण्याच्या परवानगीसह जलद सरकारी मंजुरीमुळे या विस्ताराला पाठिंबा मिळत आहे. आत्तापर्यंत एमएनजीएलने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 500 किलोमीटरचे जाळे उभारले आहे. विस्ताराचा वेग आता वाढत असून, पुढील तीन महिन्यांत पाइपलाइन बसविण्याचे काम सर्वाधिक वेगाने करण्यात येणार आहे. सध्या जरी काही सदनिकाधारकांनीच पीएनजीचा अवलंब केला, तरी संपूर्ण परिसराला सेवा देण्यासाठी या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर विकसित केल्या जात आहेत. त्यानंतर वापर वाढविण्यासाठी कंपनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासारख्या मोहिमा राबविणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande