पाणी, वीज आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमधील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पाणीपुरवठा, ऊर्जा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यात
पाणी, वीज आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमधील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पाणीपुरवठा, ऊर्जा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यात फर्दापूर परिसरातील पाणी, वीज आणि आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन ते तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करणे आणि

सावरखेडा-रेनापूरला सिल्लोड ग्रीडमधून पाणी देण्याबाबत मंत्र्यांनी सूचना केल्या. तसेच सावळदबारा येथे ३३ केव्ही उच्च दाबाची लाइन, ओव्हरलोड डीपीच्या ठिकाणी नवीन डीपी बसवणे आणि रवळा-जवळा व पळासखेडा येथील उपकेंद्रांचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश ऊर्जा विभागाला दिले. आरोग्याच्या दृष्टीने सावळदबारा, पिंपळा व फर्दापूर येथे उपकेंद्र इमारती व निवासस्थानांचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. मंत्री बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओ यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना

करण्याचे सांगितले. मे महिन्यात आपण स्वतः सोयगाव तालुक्यातील कामांची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी (व्हीसीद्वारे), वीज व पाणीपुरवठा विभागाचे सचिव व मुख्य अभियंता उपस्थित होते. तसेच भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, पं.स. सभापती उत्तम चव्हाण, सदस्य राहुल राठोड, जयप्रकाश चव्हाण, अज्जू भाई, योगेश शिंदे, निसार शेख, समाधान बावस्कर, विलास आगळे, कृष्णा शिरसाट, फिरोज तडवी, नारायण कापसे, भगवान जाधव आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande