किल्ले रायगडावर एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल यशस्वी
रायगड, 09 एप्रिल (हिं.स.)। किल्ले रायगड येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या मार्फत रोप-वे रेस्क्यू ऑपरेशनची मॉक एक्सरसाइज यशस्वीरित्या पार पडली. या सरावाचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तात्का
NDRF conducts successful rope-way rescue mock drill at Raigad Fort


रायगड, 09 एप्रिल (हिं.स.)। किल्ले रायगड येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या मार्फत रोप-वे रेस्क्यू ऑपरेशनची मॉक एक्सरसाइज यशस्वीरित्या पार पडली.

या सरावाचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ व समन्वयित प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविणे हा होता. मॉक ड्रिलदरम्यान रोप-वेवरील संभाव्य अपघात गृहित धरून बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रशिक्षित जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.

या उपक्रमात हवाई दल , भारतीय सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (धुळे व नागपूर), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी महाड, तहसीलदार महाड, आपदा मित्र, रायगड रोप-वे प्रशासन, आरोग्य विभाग तसेच महाड अग्निशमन दल यांचा सक्रिय सहभाग होता.

सर्व संबंधित विभागांनी उत्कृष्ट समन्वय साधत अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीरीत्या ही मॉक एक्सरसाइज पूर्ण केली. अशा प्रकारच्या सरावांमुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी होणारी हानी कमी करण्यास मदत होणार असून प्रशासनाची तयारी अधिक भक्कम होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande