कांद्याचा भाव ४०० रुपयांपर्यंत घसरला; शेतकरी आले मेटाकुटीला
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल, (हिं.स.)। कांदा पिकाने यंदा शेतकऱ्यांना दगा दिल्याचे चित्र वैजापूर आणि लासूर स्टेशन येथील बाजारात पाहायला मिळत आहे. प्रतिक्विंटल ४०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघतनसल्याने कांदा उत्पादक शेतकरी
कांद्याचा भाव ४०० रुपयांपर्यंत घसरला; शेतकरी आले मेटाकुटीला


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल, (हिं.स.)। कांदा पिकाने यंदा शेतकऱ्यांना दगा दिल्याचे चित्र वैजापूर आणि लासूर स्टेशन येथील बाजारात पाहायला मिळत आहे. प्रतिक्विंटल ४०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघतनसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

यंदा बदलत्या वातावरणामुळे कांदा उत्पादनातही घट झाली आहे. त्यातच बाजारात दरातील तफावत शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर घालत आहे. कांदा पिकासाठी एकरी सुमारे ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातील सरासरी १०० क्विंटल उत्पादन होत असून, सध्या मिळणाऱ्या ७०० रुपये प्रतिक्विंटल दरानुसार केवळ ७० हजार रुपयेच शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. त्यामुळे चार महिने काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उरत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कांद्याला १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना वैजापूर व लासूर स्टेशन येथील बाजार समित्यांमध्ये मात्र केवळ ४०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. दरातील तफावतीमुळे शेतकरी संतप्त झाले असून, बाजार समित्यांवर नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. योग्य दर मिळावा व दरातील तफावत कमी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande