
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली राज्य शासनाने केली असून ती बदली त्वरित रद्द करावी. आणि अन्य मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आंदोलन केले आहे. दिव्यांगांना समाजामध्ये चांगले प्रकारे स्थान मिळावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काटेकोरपणे राज्य शासनाच्या योजना राबवून दिव्यांगांना न्याय दिला व बोगस दिव्यांगांना योजनेतून बाद केले आहे.
बोगस दिव्यांग शाळेवरील शिक्षकांची चौकशी सुरू केली. राज्य शासनाच्या सेवेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनाही चौकशी लावून बोगस प्रमाणपत्र धारक शोधून काढले अशा अधिकाऱ्यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली असून ती बदली त्वरित रद्द करा त्यांना त्याच पदावर तीन वर्ष ठेवा. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील थकीत मानधन उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा, आमदार खासदारांचा निधी त्वरित खर्च करा.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis