बीड - ग्रामीण प्रवाशांची होणार सोय; १५ ठिकाणी बांधणार अद्ययावत निवारा शेड
बीड, 09 एप्रिल (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या विभागातील आवश्यक ठिकाणी अद्ययावत प्रवासी मार्ग निवारे बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात बस प्
बीड - ग्रामीण प्रवाशांची होणार सोय; १५ ठिकाणी बांधणार अद्ययावत निवारा शेड


बीड, 09 एप्रिल (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या विभागातील आवश्यक ठिकाणी अद्ययावत प्रवासी मार्ग निवारे बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात बस प्रवाशांसाठी १५ ठिकाणी अद्ययावत निवारा शेड होणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. बहुतांश ठिकाणी प्रवाशांना ऊन, वारा, पावसात बसची प्रतीक्षा करीत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड मोडकळीस आले आहेत. तर अनेक ठिकाणी त्याचा भलताच वापर होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.

दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानकांचे आधुनिकीकरणांतर्गत कामे सुरू केली. या अंतर्गतच जेथे अत्यंत गरज आहे, तेथे पहिल्या टप्प्यात अद्ययावत प्रवासी मार्ग निवारे (पिकअप शेड) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासी निवारा शेडचे काम दर्जेदार व्हावे, त्याचा सामान्य प्रवाशांना लाभ व्हावा या दृष्टीने बांधकामाची अपक्षो आहे.

बर्दापूर फाटा, लोखंडी सावरगाव, सायगाव, घाटसावळी, येळंब घाट, डोंगरकिन्ही, अंमळनेर, चुंबळी फाटा, टोकवाडी, तालखेड, दिंद्रुड, आडस, सिरसमार्ग, उमापूर फाटा आणि रोहतवाडी येथे हे प्रवासी निवारा उभारले जाणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande