
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)।
पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील कावळे नगर येथील खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने जलद व प्रभावी कारवाई करून दोन आरोपींना मध्यरात्री अटक केली आहे.
पोलीस ठाणे शिवाजीनगर, लातूर येथे गु.र.नं. 151/2026 कलम 103(1), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
1) ओम सचिन जानराव (वय 30 वर्षे, रा. खोरे गल्ली, लातूर)
2)वैभव ऊर्फ मोन्या प्रभाकर मुंडे (वय 24 वर्षे, रा. संभाजी नगर, खाडगाव रोड, लातूर)
सदर आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरातून रात्री एक वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी विठ्ठल ससाणे उर्फ शहाणे मामा यांच्यासोबत झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून लाकूड व फरशीच्या तुकड्याने मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे हजर केले असून त्यांना गुन्ह्यात अटक करून पुढील तपास सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis