बीड - डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व कौशल्य, रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन गट
बीड - डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा


बीड, 09 एप्रिल, (हिं.स.) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व कौशल्य, रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन गटांत होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, तसेच महिला, पुरुषांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन बीड आयटीआयचे प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार उखळीकर यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य' हा विषय ठेवला आहे. आयटीआय, डिप्लोमा, बायफोकल, एमसीव्हीसी विद्यार्थी असा एक गट राहील. यातील स्पर्धकांना निबंधासाठी ५०० ते ८०० शब्दमर्यादा आहे, तर दुसऱ्या खुल्या गटात पुरुष, महिलांना भाग घेता येईल. यातील स्पर्धकांना ८०० ते १२०० शब्दमर्यादा आहे. स्पर्धकांनी त्यांचे निबंध पीडीएफ स्वरूपात सोबत दिलेल्या https://forms.gle/RcFPhcUgY8X

P2NT8 लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व स्पर्धकांनी आपला निबंध १४ एप्रिल २०२६ या निर्धारित वेळेत सादर करावा. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय बक्षीस २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय बक्षीस ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे.

निबंधाचे अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाइप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा. स्पर्धकांनी त्यांचे पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, आयटीआय, शाळा, महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता आदी माहिती आवश्य भरावी, असे कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande