अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक : मतमोजणीला सुरुवात; अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत
अमरावती, 01 मे (हिं.स.) : अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीनंतर आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत १३ पैकी ७ सदस्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. काल पार पडलेल्या मतदानाला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
Amravati District Lawyers Association Election: Counting of votes begins; Triple fight for the post of president


अमरावती, 01 मे (हिं.स.) : अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीनंतर आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत १३ पैकी ७ सदस्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. काल पार पडलेल्या मतदानाला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. मतमोजणी सुरू होताच जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही उमेदवारांचे निकाल हाती येताच त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. या वेळी पोलिस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत रंगली असून ऍड. प्रशांत देशमुख, ऍड. धनराज साधवाणी आणि ऍड. अनिल विश्वकर्मा यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी अजून सुरू असून उर्वरित सदस्यांचे तसेच अध्यक्षपदाचा निकाल रात्री उशिरा, सुमारे १० वाजल्यानंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच, वकील संघाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून अंतिम निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande