हिंगणी येथील सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई
अमरावती, 01 मे (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (बु.) ग्रामपंचायतीत उघड झालेल्या गंभीर अनियमिततेवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे गावात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत व्यवस्थेवर मोठा
हिंगणी येथील सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई


अमरावती, 01 मे (हिं.स.)।

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (बु.) ग्रामपंचायतीत उघड झालेल्या गंभीर अनियमिततेवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे गावात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

या प्रकरणात तंटामुक्ती अध्यक्ष श्याम हरणे यांनी अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर झालेल्या सखोल चौकशीत ग्रामपंचायतीच्या कामकाजात नियमभंग, बैठकींच्या प्रक्रियेत त्रुटी तसेच कर्तव्यात स्पष्ट कसूर निष्पन्न झाला. चौकशी अहवालानेच सरपंचांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये दि. १४ मार्च २०२६ रोजी अमरावतीचे अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी निर्णायक आदेश देत सरपंच संदीप प्रकाश लहाने यांना पदासाठी अपात्र ठरवले. प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमभंग सहन केला जाणार नाही, असा ठोस संदेश देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande