लातूर: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
लातूर, 01 मे (हिं.स.) महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी आयोजित समारंभात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते वि
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


लातूर, 01 मे (हिं.स.) महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी आयोजित समारंभात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर पोलीस दलातील वाचक प्रमोद मोहनराव बोंडले, सहायक पोलीस उपनिरीक्षक रजनीकांत प्रल्हाद भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जीवनराव मोटेगावकर, राजेश विठ्ठलराव कंचे यांना पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्काराचेही यावेळी वितरण करण्यात आले. सुलेमान अफसर शेख, सृष्टी सुधीर जगताप, उदगीर येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुद्देशीय सेवाभागी संस्था यांना सन २०२४-२५ करिता जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच रामेश्वर धनराज चावरे, प्रणवी प्रधान ढवारे आणि एरंडी येथील स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था यांना सन २०२५-२६ करिता जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला.

कुमिदिनी भार्गव, अनघा अंधोरीकर, सुकेशनी बालाजी मुस्कावाड, आशा किशनराव पांचाळ यावेळी पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण विभागाच्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अदिब रफिक सय्यद, पुनम प्रवीण कोडे, कार्तिकी रामराव जाधव यांनाही यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande