महाराष्ट्र दिनानिमित्त कोकण विभागात उत्साह; आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण
रायगड, 01 मे (हिं.स.)। : महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच
Excitement in Konkan division on the occasion of Maharashtra Day; Flag hoisting by Commissioner Rubal Agarwal


रायगड, 01 मे (हिं.स.)। : महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

समारंभात विविध पोलीस व आपत्कालीन सेवांच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राज्य राखीव पोलीस दल क्र.११, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, श्वान पथक, निर्भया पथक, बुलेटप्रूफ व बीडीडीएस वाहने तसेच रस्ता सुरक्षा अभियान पथकांनी संचलनात सहभाग घेतला.

पोलीस विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक रमेश पंढरीनाथ भामे, पोलीस निरीक्षक सुनिल दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक रमेश आनंदा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र रघुनाथ राऊत, पोलीस हवालदार संजय बाळाराम तांडेल, सचिन साहेबराव शेवाळे, मच्छिंद्र उखा पवार, सचिन एकनाथ कडू, पोलीस नाईक अभय आत्माराम सांगळे यांच्यासह सी सेवा पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरेश नागरे आणि पोलीस नाईक पृथ्वीराज अजितसिंग घोरपडे यांना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी भारत सरकारच्या जनगणना-२०२७ मोहिमेंतर्गत प्रथमच नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची “स्वगणना” सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ, अपर आयुक्त फरोग मुकादम, सहआयुक्त प्रमोद केंभावी, रवि पाटील, रविंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande