महाराष्ट्र दिनानिमित्त मराठवाडा विद्यापीठात ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.एक) ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य इमारती समोरील हिरवळीवर सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हा कार्यक्रम झ
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.एक) ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य इमारती समोरील हिरवळीवर सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हा कार्यक्रम झाला यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांच्यासह अधिष्ठाता, सर्व संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande