रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण उत्साहात
रायगड, 01 मे (हिं.स.) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले.
Flag hoisting on Maharashtra Day at the Collectorate office with enthusiasm


रायगड, 01 मे (हिं.स.)

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपवनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपस्थितांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande