
नांदेड, 01 मे (हिं.स.)।
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत
नांदेड येथील श्री.शंकरराव चव्हाण सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित 'कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा' संपन्न झाला..
समाजातील तळागाळातील घटकांना आणि विशेषतः ओबीसी प्रवर्गातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे यासाठी शासन कटिबद्ध आहे..
वर्षभरात ७५ विद्यार्थ्यांना जवळपास ६० लक्ष रुपयांपर्यंत परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात ६२ जिल्हानिहाय वसतीगृहे उभारली असून त्यात ३१ मुलींसाठी व ३१ मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत..
आधार योजनेच्या माध्यमातूनही ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय शासनाकडून करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. व्हीजेएनटीच्या ९०० आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेतून इस्रोसारख्या संस्थांना भेट देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे..
या मेळाव्यात अनेक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जवाटप तसेच वाहनांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले..
यावेळी खासदार तथा माजी मुख्यमंत्री श्री.अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार श्री.राजेश पवार, आमदार श्री.बाबुराव कोहळीकर, महापौर कविताताई मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाताई कावली, संचालक सोनालीताई मुळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ.वसंत माने, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.मिलिंद नारिंगे यांच्यासह नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील अधिकारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis