
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिनानिमित्त आज धाराशिव जिल्हा परिषदेत अभिमान आणि उत्साहाच्या वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. राष्ट्रध्वज फडकावून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या महान विभूतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड यांच्यासह सर्व सभापती, प्रमुख अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis