“ममता दीदींचा ‘खेळा’ संपणार; बंगालमध्ये भाजप सरकार” – नवनीत राणा
अमरावती, 01 मे (हिं.स.) : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. यंदाच्या एक्झिट पोलमधून राज्यात मोठा राजकीय बदल होण्याचे संकेत मिळत असून, जनतेचा कल भारतीय जनता प
“ममता दीदींचा ‘खेळा’ संपणार; यंदा बंगालमध्ये भाजप सरकार” – नवनीत राणा


अमरावती, 01 मे (हिं.स.) : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. यंदाच्या एक्झिट पोलमधून राज्यात मोठा राजकीय बदल होण्याचे संकेत मिळत असून, जनतेचा कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला.

राणा म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील जनता अवैध घुसखोरी आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे त्रस्त झाली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, परिस्थिती इतकी बिघडली आहे की मुख्यमंत्री स्वतः महिलांना सायंकाळनंतर घराबाहेर न पडण्याचा सल्ला देतात, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना राणा म्हणाल्या की, यंदाच्या निवडणुकीत महिलांनी आणि मातांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून परिवर्तनाला पाठिंबा दिला आहे. “या वेळी ममता दीदींचा ‘खेळा’ चालणार नाही, तर भाजपच्या विचारसरणीला जनतेचा कौल मिळणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इव्हीएम संदर्भात तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही, मात्र पराभवाची शक्यता निर्माण झाली की त्याच यंत्रणेला दोष देण्याची जुनी पद्धत विरोधकांकडून वापरली जाते, असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी ठामपणे म्हटले की, या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन होईल. महिलांची सुरक्षा, अवैध घुसखोरीवर नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande