नेरळचे एपीआय राहुल वरुटे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह
रायगड, 01 मे (हिं.स.)। कापिलेश्वर गावचे सुपुत्र तथा सध्या नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रघुनाथ वरुटे यांना उत्कृष्ट, कर्तव्यदक्ष व धाडसी कामगिरीबद्दल पोलीस दलातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे पोलीस महासंचाल
Neral's API Rahul Varute awarded with Director General of Police's Commendation


रायगड, 01 मे (हिं.स.)। कापिलेश्वर गावचे सुपुत्र तथा सध्या नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रघुनाथ वरुटे यांना उत्कृष्ट, कर्तव्यदक्ष व धाडसी कामगिरीबद्दल पोलीस दलातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

पोलीस सेवेत कार्यरत असताना खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा अत्यंत कौशल्यपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस विभागाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.राहुल वरुटे यांनी आपल्या सेवाकाळात धाडसी कारवाया, गुन्हे तपासातील अचूकता, कायदा व सुव्यवस्था राखण्यात दाखवलेली तत्परता आणि नागरिकांशी समन्वयपूर्ण वागणूक यामुळे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून ते प्रभावीपणे जबाबदारी सांभाळत आहेत.

त्यांच्या या यशामुळे कापिलेश्वर गावासह कर्जत तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक, राजकीय तसेच पोलीस क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सेवेसाठी नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande