ठाणे महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
ठाणे, 01 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7.15 मिनिटांनी महापालिका महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी राष्ट्र
Thane


ठाणे, 01 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7.15 मिनिटांनी महापालिका महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

ध्वजवंदनानंतर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. ललिता जाधव, कमल सोनावणे, गीता लीचिते, सुनील घोलप, संतोष केळसकर, सविता बोरकर, पुष्पा पाटील, विध्नेश वागडले, प्रशांत सपकाळ, मारुती बोडके या 10 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच ठाणे अग्निशमन विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्राालयांनी सन्मानित केले होते. त्या कर्मचाऱ्यांमधील अग्न‍िशम केंद्र अधिकारी प्रदीप पाटील, नितीन शिंदे, संदीप कदम, दिनेश पाटील, सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी आनंदा पावणे, बालू मुंडे, प्रविण भोई, लिडींग फायरमन धनाजी काकडे, जितेंद्र चुरमुरे, अशोक पाटील, शिवाजी मेंगाळ, चालक यंत्रचालक संदीप लांजेकर, दिपक सोनावणे, चंद्रकांत घडशी, फायरमन महादेव वारंग, सचिन खेडेकर, नंदकिशोर बागुल आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ध्वजवंदन सोहळ्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. पठाण अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मधूकर बोडके, डॉ. मिताली संचेती, दिपक झिंजाड, जितेंद्र निकम, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, बाळू पिचड, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, विधी सल्लागार मकरंद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी तर ठाणे स्टेशन येथील पुतळ्यास डॉ. मिताली संचेती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महेशकुमार जामनोर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande