
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनीमहाराष्ट्र दिनानिमित्त आज भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित राहून महाराष्ट्राच्या महान परंपरेचा, त्यागाचा आणि शौर्याचा अभिमानाने स्मरण केले. उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी स्वराज्य संकल्पनेतून उभा राहिलेला हा महाराष्ट्र, आजही विकास, संस्कृती आणि प्रगतीचा दीपस्तंभ आहे. या गौरवशाली वारशाला साजेसं कार्य करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे, याची जाणीव यावेळी पुन्हा दृढ झाली.
आपलं धाराशिव देखील वेगाने बदलत असून अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे जिल्हा प्रगतीच्या नव्या उंचीवर झेपावत आहे. या विकास यात्रेला अधिक गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis