मराठवाडा विद्यापीठाकडून 'ऍकॅडमिक कॅलेंडर' जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागांना येत्या २ मे पासून उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत, अशी माहिती शैक
मराठवाडा विद्यापीठाकडून 'ऍकॅडमिक कॅलेंडर' जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागांना येत्या २ मे पासून उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत, अशी माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून शैक्षणिक 'अॅकडमिक कॅलेंडर'चे तंतोतंत पालन केले जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १६ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली होती. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बीड, धाराशिव, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयांना १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्यांचे आदेश देण्यात आले आहेत.दुसऱ्या बाजूला, विद्यापीठाचा मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसर येथील पदव्यूत्तर विभागांना २ मे पासून उन्हाळी सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ १५ जून पासून

दुसऱ्या शैक्षणिक वर्षासाठी ऍकडमिक कॅलेंडर-२०२६-२७ जाहीर करण्यात आले आहे. यानुसार नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होईल. तसेच, ३१ जुलैपर्यंत पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.

शैक्षणिक कॅलेंडरमध्ये पुढील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आविष्कार स्पर्धा २९ व ३० जुलैला होईल, केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, दीक्षांत समारंभ ऑक्टोबर महिन्यात होईल, तर प्रथम सत्र परीक्षा २१ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान आयोजित केल्या जातील. दुसऱ्या सत्राची सुरुवात १६ डिसेंबरपासून होईल. त्यानंतर दुसरा लोककला महोत्सव १२ व १३ जानेवारी रोजी आणि वार्षिक परीक्षा ९ एप्रिल ते १९ मे २०२७ या दरम्यान होणार आहे.

विद्यापीठाने हे सर्व कार्यक्रम तंतोतंत 'अॅकडमिक कॅलेंडर'मध्ये समाविष्ट केले असून, शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कार्यप्रणाली राखण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

विद्यापीठ परिषद आणि शैक्षणिक विभागांचे समन्वय

हे सर्व कार्यक्रम आणि वेळापत्रक विद्यापीठ परिषदेत मान्यता प्राप्त करून घोषित करण्यात आले. डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी पुढील वर्षातील शैक्षणिक वेळापत्रक आणि कार्यक्रमांचे नियोजन जाहीर केले.

संपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम एकसूत्रीपणे समन्वयित होण्याचे आश्वासन कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande