
सोलापूर, 01 मे (हिं.स.)। विश्वमंगल मराठी फाउंडेशनचा शुभारंभ सोहळा दि. १ मे रोजी आळंदी येथील फंडवले धर्मशाला, फ्रुटवाले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी अर्पण करून माऊलींचे मनोभावे घेतले.
शुभारंभ सोहळा यशस्वीरीत्या पार पडावा, संस्थेच्या कार्याला व्यापक दिशा मिळावी आणि मराठी अस्मितेला जागतिक स्तरावर नवे स्थान प्राप्त व्हावे, यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना केली.मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव वाढविणे, तसेच नवउद्योजकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीस चालना मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड