जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रात 11 लाख घरांनी पूर्ण केली स्वगणना
नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.) - जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिला होता. महाराष्ट्रात 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत स्व गणनेचा कालावधी होता. जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जनतेला सोयीची व्
जनगणना 2027


नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.) - जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिला होता. महाराष्ट्रात 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत स्व गणनेचा कालावधी होता.

जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जनतेला सोयीची व्हावी, यासाठी, स्व-गणना सुविधा देण्यात आली होती. एका समर्पित वेब पोर्टलच्याद्वारे, घरातूनच ह्या स्वगणनेची माहिती, ऑनलाईन आपल्या सुविधेनुसार भरणे शक्य होते. या अधिसूचित केलेल्या कालावधीत एकूण 12,60,950 घरांनी स्व गणनेला सुरुवात केली. त्यापैकी, 11,14,277 घरांनी यशस्वीपणे स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केली.

ज्या कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला “H” या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्व-गणना ओळखक्रमांक (SE ID) उपलब्ध करून द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल.

ज्यांनी स्व-गणना सुविधा वापरलेली नाही किंवा ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातील सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देणार आहेत.

जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे आणि अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुक्रमांक

जिल्हा

स्व गणना पूर्ण करणाऱ्या घरांची संख्या

1.

अहिल्यानगर

24036

2.

अकोला

15692

3.

अमरावती

36223

4.

बीड

20865

5.

भंडारा

7777

6.

बुलडाणा

21711

7.

चंद्रपूर

10893

8.

छत्रपती संभाजीनगर

34242

9.

धाराशिव

16890

10.

धुळे

12932

11.

गडचिरोली

3688

12.

गोंदिया

3881

13.

हिंगोली

4823

14.

जळगाव

31802

15.

जालना

23901

16.

कोल्हापूर

23524

17.

लातूर

16398

18.

मुंबई

61295

19.

मुंबई उपनगरे

121068

20.

नागपूर

37534

21.

नांदेड

27704

22.

नंदूरबार

6957

23.

नाशिक

52667

24.

पालघर

27074

25.

परभणी

18093

26.

पुणे

153568

27.

रायगड

28626

28.

रत्नागिरी

8631

29.

सांगली

17033

30.

सातारा

26654

31.

सिंधुदुर्ग

29591

32.

सोलापूर

34313

33.

ठाणे

116512

34.

वर्धा

7618

35.

वाशिम

7743

36.

यवतमाळ

22318

एकूण

1,114,277

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande