पंतप्रधानांकडून लखीमपूर खेरी रस्ते अपघाताबद्दल शोक व्यक्त, सानुग्रह मदत जाहीर
नवी दिल्ली, १८ मे (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि नुकसान भरपाई जाहीर केली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, १८ मे (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि नुकसान भरपाई जाहीर केली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले की, लखीमपूर खेरी येथील अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत.

पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

सोमवारी सकाळी लखीमपूर-बहराइच महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande