स्वीडनच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदींच सन्मान
अ‍ॅमस्टरडॅम / नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) - स्वीडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ''रॉयल ​​ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस'' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा स्वीडनचा कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा सरकार प्रमुखांना दिला जाण
मोदी स्वीडन पुरस्कार


अ‍ॅमस्टरडॅम / नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) - स्वीडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'रॉयल ​​ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा स्वीडनचा कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा सरकार प्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. मोदींना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

रविवारी गोटेबर्ग येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

मोदी ८ वर्षांनंतर स्वीडनला पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये स्वीडनला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींचे विमान स्वीडनच्या सीमेवर पोहोचताच सुरक्षेसाठी स्वीडिश लढाऊ विमानांनी त्याला संरक्षण दिले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गोटेबर्ग विमानतळावर पोहोचले होते.

‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ हा स्वीडन सरकारकडून परदेशी नागरिक आणि जागतिक नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्कारातील ‘कमांडर ग्रँड क्रॉस’ ही सर्वात उच्च श्रेणी मानली जाते. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, जागतिक शांतता आणि दोन देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांनाच या पुरस्काराने सन्मानित केले जाते. रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टारची स्थापना १७४८ मध्ये करण्यात आली आणि स्वीडनसाठी किंवा स्वीडिश हितासाठी, विशेषतः सार्वजनिक उपक्रमांमधील वैयक्तिक प्रयत्नांना, तसेच सार्वजनिक कार्ये आणि कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मान्यता देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

स्वीडनच्या या पुरस्कारासह पंतप्रधान मोदींना परदेशी सरकारे आणि जागतिक संस्थांकडून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची एकूण संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. पुरस्कारावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर १४० कोटी भारतीयांसाठीही एक सन्मान आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande