धिरज देशमुखांकडून राजा शिवाजी चित्रपटाचे कौतुक
लातूर, 02 मे (हिं.स.)। धीरज विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे मनापासून कौतुक करत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या व पुढील पिढीसाठी एक प्रेरणा
धिरज देशमुख


लातूर, 02 मे (हिं.स.)। धीरज विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे मनापासून कौतुक करत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या व पुढील पिढीसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट उभारण्यासाठी घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांसह हा उत्कृष्ट चित्रपट पाहावा, असे आवाहन करत या सुंदर कलाकृतीबद्दल त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande