‘पेट्रोल नाही’ म्हणताच कर्मचाऱ्याच्या पोटात खुपसला चाकू
जळगाव, 20 मे (हिं.स.)जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील पेट्रोल पंपावर एक धक्कादायक आणि जीवघेणी घटना घडली. ंपावर पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक नसल्याने कर्मचाऱ्याने इंधन देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने दोन अनोळखी तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ
‘पेट्रोल नाही’ म्हणताच कर्मचाऱ्याच्या पोटात खुपसला चाकू


जळगाव, 20 मे (हिं.स.)जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील पेट्रोल पंपावर एक धक्कादायक आणि जीवघेणी घटना घडली. ंपावर पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक नसल्याने कर्मचाऱ्याने इंधन देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने दोन अनोळखी तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या पोटात थेट चाकू खुपसला. या हल्ल्यात तुषार गुरव (वय २१) हा कर्मचारी जखमी झाला. हा संपूर्ण थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील पंप कर्मचारी प्रचंड धास्तावले असून पंपांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande