प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यांची गरोदर, आरोपी अटकेत
रायगड, 21 मे (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील चिंचवली शेकीन, भवानी मठ परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आ
Minor girl raped over love affair; Four months pregnant, accused arrested


रायगड, 21 मे (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील चिंचवली शेकीन, भवानी मठ परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मूळच्या बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील असून सध्या त्या चिंचवली शेकीन, भवानी मठ, ता. खालापूर येथे वास्तव्यास आहेत. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही मूळगावी मजुरीचे काम करीत असताना आरोपीशी तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

पीडित मुलगी ही 17 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारातून पीडितेला गर्भधारणा होऊन ती चार महिन्यांची गरोदर राहिल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे गुरनं.185/2026, बाल लै.अत्या.संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 चे कलम 4,6 , बी.एन.एस 2023 64(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/सुरेश गागरे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande