रात्री चोरी, सकाळी अटक! नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई
रायगड, 20 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या टोळीने रायगड आणि ठाणे ग्रामीण परिसरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्य
**गुन्हा रजी. नं. १००/२०२६ : नेरळ पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश**  अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या टोळीने रायगड आणि ठाणे ग्रामीण परिसरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ९१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी हे मुरबाड तालुक्यातील हसरा परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.  अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये करण अनिल शिनगारे (वय १९) आणि सुजल सुभाष जाधव (वय १९) यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी नेरळ बाजारपेठ, पोही गाव तसेच पाटगाव परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.  या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशील काजोळकर, पोलीस हवालदार वाघमारे (ब.क्र. २३८४) तसेच पोलीस अमलदार केकान, बेंद्रे आणि वांगणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गुन्हा रजी. नं. १००/२०२६ चा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.  या प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


रायगड, 20 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या टोळीने रायगड आणि ठाणे ग्रामीण परिसरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ९१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी हे मुरबाड तालुक्यातील हसरा परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये करण अनिल शिनगारे (वय १९) आणि सुजल सुभाष जाधव (वय १९) यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी नेरळ बाजारपेठ, पोही गाव तसेच पाटगाव परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशील काजोळकर, पोलीस हवालदार वाघमारे (ब.क्र. २३८४) तसेच पोलीस अमलदार केकान, बेंद्रे आणि वांगणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गुन्हा रजी. नं. १००/२०२६ चा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande