केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन, रात्रभर बचावकार्य सुरूच, यात्रेकरू सुरक्षित
केदारनाथ, २० मे (हिं.स.)मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग-गौरीकुंड मार्गावरील तीन ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ मंदिर यात्रा मार्गात अडथळा निर्माण झाला. पण, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईम
केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन


केदारनाथ, २० मे (हिं.स.)मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग-गौरीकुंड मार्गावरील तीन ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ मंदिर यात्रा मार्गात अडथळा निर्माण झाला. पण, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि हजारो यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, १९ मे पर्यंत ६.९४ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी बाबा केदारनाथला भेट दिली होती. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मार्गावर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच, जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आणि अधिकाऱ्यांना मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले.

आव्हानात्मक परिस्थितीत मदत पथकांनी सुमारे ३० मिनिटांत पादचारी मार्ग अंशतः पुन्हा सुरू केला. त्यानंतर यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. प्रशासनाने यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत सतत देखरेख आणि मदतकार्य सुरू ठेवले. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवल्यानंतर रस्ता नंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. प्रशासनाने सांगितले की, सध्या यात्रा नियंत्रित पद्धतीने पार पडत असून हवामानावर सतत लक्ष ठेवले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande