उपराष्ट्रपतींनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडूरी यांना वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी जी यांना डेहराडून येथील त्यांच्या निवासस्थानी भावपूर्ण आदरांजली वाहिली. आपले आयुष्य राष्ट्रसेवेसा
VP CP Radhakrishnan Tribute FORMER CM Khanduri


VP CP Radhakrishnan Tribute FORMER CM Khanduri


नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी जी यांना डेहराडून येथील त्यांच्या निवासस्थानी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करणारे मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी एक असामान्य नेते, पराक्रमी सैनिक आणि माजी प्रशासक म्हणून सदैव स्मरणात राहतील, असे उपराष्ट्रपतींनी खांडूरी यांना आदरांजली वाहताना म्हटले आहे.

देशातील संपर्कव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारताच्या रस्ते विकासातील पायाभूत सेवांसाठी मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी यांनी केलेले कार्य म्हणजे देशाच्या विकासात्मक प्रवासातील एक चिरस्थायी वारसा आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande