अमेरिकेकडून समुद्री दरोडेखोरीला सामान्य करण्याचा प्रयत्न - इस्माईल बगाई
तेहरान, 03 मे (हिं.स.)।इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यावर टीका केली, ज्यामध्ये त्यांनी स्वतःला समुद्री चाचे (पायरेट्स) असल्यासारखे म्हटले होते. बगाई यां
अमेरिका समुद्री दरोडेखोरीला सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे- इस्माईल बगाई


तेहरान, 03 मे (हिं.स.)।इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यावर टीका केली, ज्यामध्ये त्यांनी स्वतःला समुद्री चाचे (पायरेट्स) असल्यासारखे म्हटले होते. बगाई यांनी वॉशिंग्टनवर इराणी जहाजे जप्त करून समुद्री दरोडेखोरीला सामान्य बनवण्याचा आरोप केला.

प्रवक्ते बगाई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी जहाजांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या कृतीला उघडपणे ‘समुद्री दरोडेखोरी’ असे संबोधले आणि बेशर्मीने आपण समुद्री चाच्यांप्रमाणे वागत असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, हे कुठलेही चुकून निघालेले वक्तव्य नसून आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीविरोधात केलेल्या गुन्हेगारी कृत्यांची थेट आणि गंभीर कबुली आहे.त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य देश आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना आवाहन केले की, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अशा गंभीर उल्लंघनाला सामान्य करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना पूर्णपणे नाकारावे.

इराणकडून ही प्रतिक्रिया ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यावर आली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, “आम्ही समुद्री चाच्यांसारखे आहोत.” फ्लोरिडामधील पाम बीच येथील फोरम क्लबमध्ये झालेल्या एका डिनरदरम्यान ट्रम्प यांनी समुद्रातील अमेरिकन लष्करी कारवायांचे सविस्तर वर्णन केले. त्यांनी सरळ आणि स्पष्ट भाषेत जहाजे आणि तेल टँकर जप्त करण्याची प्रक्रिया सांगितली.

ट्रम्प यांनी सांगितले की, एका लष्करी कारवाईदरम्यान त्यांच्या अधिकाऱ्यांनी एका जहाजाला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर ते निष्क्रिय केले. ते म्हणाले, “तुमचे जहाज वळवा! त्वरित इंजिन कक्ष रिकामा करा.” त्यांनी पुढे सांगितले की, “तुम्ही पाहू शकता की सगळे लोक तिथून पळत आहेत.” ट्रम्प पुढे म्हणाले, “कोणाला वाटले होते की आपण असे करू? आम्ही समुद्री चाच्यांसारखे आहोत. काही प्रमाणात आम्ही तसेच आहोत.”

त्यांनी या कारवाईला इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाचा भाग असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही खेळ खेळत नाही, कारण गेल्या ४७ वर्षांपासून इराण सर्वांना धमकावत आला आहे. खरे दादागिरी करणारे तेच आहेत.”

ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत व्यवस्थेवर आणि नेतृत्वावरही टीका केली. ते म्हणाले की, अमेरिकन अधिकाऱ्यांना तेहरानमध्ये नेमके कोणाशी व्यवहार करायचा आहे हे समजत नाही. त्यांनी म्हटले, “त्यांच्याकडे ना रडार आहेत, ना कोणतेही नेते. प्रत्यक्षात त्यांचे सर्व नेते गेले आहेत. ही आमच्यासाठी एक समस्या आहे. ते फोन करून म्हणतात – ‘मी मोहम्मद आहे.’ मी विचारतो – ‘तुम्ही नेता आहात का?’ आम्ही तर एखादा नेता शोधत आहोत. हे जगातील एकमेव देश आहे, जिथे कोणीही नेता बनण्यास तयार नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande