चीनने इराणच्या तेलावरील अमेरिकेच्या निर्बंधांना फेटाळले
बीजिंग , 03 मे (हिं.स.)।चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारिक आणि कूटनीतिक तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने इराणकडून तेल खरेदी केल्याचा आरोप असलेल्या आपल्या पाच “टीपॉट” रिफायनऱ्यांवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना बेकायदेशीर
चीनने इराणच्या तेलावरील अमेरिकेच्या निर्बंधांना फेटाळले


बीजिंग , 03 मे (हिं.स.)।चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारिक आणि कूटनीतिक तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने इराणकडून तेल खरेदी केल्याचा आरोप असलेल्या आपल्या पाच “टीपॉट” रिफायनऱ्यांवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना बेकायदेशीर ठरवत त्यांच्या विरोधात ‘निषेधाज्ञा’ जारी केली आहे. चीनी सरकारने स्पष्ट केले आहे की ते या एकतर्फी निर्बंधांना मान्यता देणार नाही आणि त्यांना राष्ट्रीय सार्वभौमत्व व सुरक्षेविरोधी मानते.

हा निर्णय विशेषतः हेंगली पेट्रोकेमिकल आणि इतर चार स्वतंत्र “टीपॉट” रिफायनऱ्यांना अमेरिकन आर्थिक प्रणालीतून बाहेर काढण्याच्या कारवाईच्या प्रत्युत्तरात घेण्यात आला आहे. चीनच्या मते, हे निर्बंध आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन करतात. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की त्यांनी जारी केलेल्या निषेधाज्ञेनुसार या निर्बंधांना मान्यता दिली जाणार नाही, त्यांची अंमलबजावणी केली जाणार नाही किंवा त्यांचे पालनही केले जाणार नाही. हा निर्णय राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासहितांचे संरक्षण करण्यासाठी घेतल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “संयुक्त राष्ट्रांची मंजुरी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार नसलेल्या एकतर्फी निर्बंधांना चीन सरकार सातत्याने विरोध करत आहे.” या आदेशाद्वारे हेंगली पेट्रोकेमिकल (डालियान) रिफायनरीसह इतर चार तथाकथित “टीपॉट” रिफायनऱ्यांवर—शॅनडोंग जिनचेंग पेट्रोकेमिकल ग्रुप, हेबेई शिनहाई केमिकल ग्रुप, शौगुआंग लुकिंग पेट्रोकेमिकल आणि शॅनडोंग शेंगशिंग केमिकल—लादलेले अमेरिकन निर्बंध निष्प्रभ ठरवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी अमेरिकेच्या वित्त विभागाने या निर्बंधांची घोषणा करताना हेंगलीला इराणच्या सर्वात महत्त्वाच्या ग्राहकांपैकी एक म्हटले होते आणि कच्चे तेल खरेदीद्वारे इराणी लष्करासाठी शेकडो दशलक्ष डॉलरचा महसूल निर्माण केल्याचा आरोप केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande