इराकची सीरियामार्गे तेल निर्यात पुन्हा सुरू
बगदाद, 03 मे (हिं.स.)। इराकने सीरियातील अल-यारूबियाह सीमापार मार्गाद्वारे तेल निर्यात पुन्हा सुरू केले आहे. ७० टँकरांचा एक ताफा या मार्गाने सीरियात दाखल झाला असून, मागील १४ वर्षांतील हा पहिलाच असा पुरवठा आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थाच्या माहित
इराकने सीरियामार्गे तेल निर्यात केली पुन्हा सुरू


बगदाद, 03 मे (हिं.स.)। इराकने सीरियातील अल-यारूबियाह सीमापार मार्गाद्वारे तेल निर्यात पुन्हा सुरू केले आहे. ७० टँकरांचा एक ताफा या मार्गाने सीरियात दाखल झाला असून, मागील १४ वर्षांतील हा पहिलाच असा पुरवठा आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, हा ताफा भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बानियास रिफायनरीकडे रवाना झाला.

अल-यारूबियाह क्रॉसिंगवर तैनात सीरियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, “१४ वर्षांनंतर या मार्गाचे पुन्हा उघडणे हे इराक आणि सीरिया यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, यामुळे व्यापार आणि ऊर्जा पुरवठा अधिक प्रभावीपणे सुलभ होईल आणि दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन भागीदारी विकसित होईल. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मुज (हॉर्मुझ सामुद्रधुनी) अमेरिके-इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे बंद आहे, त्यामुळे इराक पर्यायी तेल निर्यात मार्ग शोधत आहे.

हा सीमापार मार्ग, ज्याला इराकमध्ये राबिया म्हणून ओळखले जाते, २०११ मध्ये सीरियन गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आला होता. नंतर २०१४ मध्ये या भागावर आयएसआयएलने ताबा मिळवला होता, जो नंतर इराकी कुर्द दलांनी पुन्हा हस्तगत केला. दरम्यान, सीरिया पेट्रोलियम कंपनीने सोशल मीडियावरून आपल्या कार्यक्षमतेत वाढ केल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, पुरवठा जलद करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. बानियास रिफायनरीमध्ये तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांनंतर आता दररोज सुमारे ५०० इराकी टँकर अनलोड केले जात आहेत. या सुधारणा केल्यामुळे रिफायनरीच्या कार्यक्षमतेत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande