
बीड, 03 मे (हिं.स.)। अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधील ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना ज्ञानेश्वर पाळवदे (रा. पिसेगाव, ता. केज) अंबाजोगाई बसस्थानकात आल्या होत्या. बस
स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ असताना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून अर्चना यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झालेल्या ऐवजामध्ये २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस आणि १० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातले दागिणे यांचा समावेश आहे. या प्रकरणी अर्चना पाळवदे यांच्या फिर्यादीवरून ३० एप्रिल रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis