सोलापूर - निलम बेकरी जवळ भर दिवसा युवकाचा निर्घृण खून
सोलापूर, 03 मे (हिं.स.)। शहरातील गजबजलेल्या 70 फूट रोड परिसरातील माधवनगर येथील निलम बेकरी जवळ आज भर दिवसा एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण शहरात एकच खळबळ
सोलापूर - निलम बेकरी जवळ भर दिवसा युवकाचा निर्घृण खून


सोलापूर, 03 मे (हिं.स.)।

शहरातील गजबजलेल्या 70 फूट रोड परिसरातील माधवनगर येथील निलम बेकरी जवळ आज भर दिवसा एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून संबंधित युवकाची हत्या केली. हल्ला इतका अचानक झाला की नागरिकांना काही समजण्याआधीच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वैमनस्यातून किंवा वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत सोलापूर शहर व जिल्ह्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

पोलिस प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande