
लातूर, 03 मे (हिं.स.) लातूर पोलीस दलातील मोटार वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या प्रियंका चव्हाण (वय २८) यांनी पोलीस वसाहतीतील त्यांच्या राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्चेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. प्रियंका चव्हाण या लातूर येथील पोलीस वसाहतीत राहात होत्या. आत्महत्या मागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis