बीड - आष्टीचे भुमिपुत्र बजरंग बनसोडे यांना महासंचालक सन्मानचिन्ह
बीड, 03 मे (हिं.स.)। मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त गुन्हे (प्रतिबंधक) म्हणून कार्यरत असलेल्या बनसोडे यांना प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०२५ प्रदान करण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते हा गौरव सोहळा दिमाखात पार
बीड - आष्टीचे भुमिपुत्र बजरंग बनसोडे यांना महासंचालक सन्मानचिन्ह


बीड, 03 मे (हिं.स.)। मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त गुन्हे (प्रतिबंधक) म्हणून कार्यरत असलेल्या बनसोडे यांना प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०२५ प्रदान करण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते हा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. बजरंग बनसोडे यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. एका ग्रामीण कुटुंबात

जन्मलेल्या बनसोडे यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'शिक्षक' म्हणून केली होती. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याची ओढ आणि खाकी वर्दीचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला. मुंबईसारख्या

महानगरात पोलीस उपायुक्त

(गुन्हे प्रतिबंधक) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कामकरताना, त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांना पोलीस सेवाकाळात आजपर्यंत १५६ प्रशस्तीपत्र पोलीस दलाकडून देण्यात आले आहेत. त्यांची हीच कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पोलीसदलाने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. बनसोडे यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले नाही, तर अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यातही हातखंडा मिळवला. जून २०२२ ते जून २०२५ या काळात त्यांनी 'एनआयए'मध्ये कार्यरत असताना देशाच्यासुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ३२ दहशतवाद्यांना जेरबंद करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आयएसआयएस सारख्या दहशतवादी संघटनेच्या विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेसाठी त्यांना भारत सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक 'देऊन गौरविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande