
- सीमावर्ती भागात ट्रकमधून डिझेल काढून चढ्या भावात विक्री
लातूर, 03 मे (हिं.स.)।
राज्यातील अनेक भागांप्रमाणे लातूर जिल्ह्यातही सध्या डिझेलचा तुटवडा तीव्र जाणवत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि मालवाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर डिझेल काळा बाजाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीदरम्यान ट्रक मधून डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
निलंगा तालुक्यात अशाच प्रकारे ट्रकमधून डिझेल काढून विक्री केली जात असल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डिझेलच्या टंचाईमुळे वाहनचालकांवर अशा मार्गांचा अवलंब करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis