रक्तदान शिबिरांच्या घटलेल्या संख्येमुळे रक्तदानाचे प्रमाण घटले
पुणे, 03 मे (हिं.स.)। शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी परगावी गेलेला मोठा वर्ग, रक्तदान शिबिरांची घटलेली संख्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील विविध रु
रक्तदान शिबिरांच्या घटलेल्या संख्येमुळे रक्तदानाचे प्रमाण घटले


पुणे, 03 मे (हिं.स.)। शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी परगावी गेलेला मोठा वर्ग, रक्तदान शिबिरांची घटलेली संख्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भेडसावत आहे. मे महिन्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

दर वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात रक्तसंकलन कमी होत असते. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा आणि त्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांचा काळ, परगावी गेलेला मोठा वर्ग यामुळे शहरांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या जेमतेम असते. या महिन्यांचा विचार केला, तर यंदा शहरात आतापर्यंत केवळ दोन ते तीनच मोठी शिबिरे झाली. शहराची गरज लक्षात घेता हा आकडा अगदीच तुटपुंजा आहे.

पुणे शहराला दररोज अंदाजे १५०० रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र जेमतेम ७०० ते ८०० पिशव्यांची उपलब्धता असते. अशा वेळी नातेवाईकांना रक्त पेढ्यांमध्ये रक्त मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. मे महिन्यात कडक उन्हाळा आणि सुट्ट्यांचा काळ यामुळे ही टंचाई अधिक गडद होऊ शकते. त्यातही गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणारे सिंगल डोनर प्लेटलेटस मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande