पुणे - भाडेतत्त्वावरील ५०० सीएनजी बसच्या वाहतुकीच्या दरात एक रुपयांनी घट
पुणे, 03 मे (हिं.स.)। पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या स्व मालकीच्या १ हजार सीएनजी बसमध्ये ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रणाली बसविण्यावर पीएमपीच्या संचालक मंडळांनी शिक्कामोर्तब केले आहे. रखडलेल्या ‘नवीन बसचा प्रवास’
PMPML


पुणे, 03 मे (हिं.स.)। पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या स्व मालकीच्या १ हजार सीएनजी बसमध्ये ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रणाली बसविण्यावर पीएमपीच्या संचालक मंडळांनी शिक्कामोर्तब केले आहे. रखडलेल्या ‘नवीन बसचा प्रवास’ आता वेगाने होईल. वर्षाच्या अखेर तब्बल १६०० नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. भाडेतत्त्वावरील ५०० सीएनजी बसच्या वाहतुकीच्या दरात एक रुपयांनी घट झाली असल्याने पीएमपी प्रशासनाचे दर महिन्याला ३० लाख तर वर्षाला ३ कोटी ६० लाख रुपयांची बचत होणार आहे. पीएमपी प्रशासनाने यापूर्वीच स्व मालकीच्या एक हजार बसच्या खरेदीस मंजुरी दिली. मात्र यात ‘आयटीएमएस’चा समावेश नव्हता. ‘आयटीएमएस’ नसल्याचा परिणाम प्रवासी सुविधेवर झाला असता. याचा थेट फटका प्रवाशांना बसला असता. परिणामी पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी पुढाकार घेऊन नवीन बसमध्ये ‘आयटीएमएस’ बसविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारच्या बैठकीत त्याला मान्यता देखील मिळाली. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande