लातूर शहरात नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांंसह पालकांची गर्दी
लातूर, 03 मे (हिं.स.)। डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन हजारो विद्यार्थ्यांची आज धडपड सुरू आहे. देशभरात आज नीट परीक्षेचं आयोजन करण्यात आले असून, लातूर शहरात परीक्षार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. लातूर हे शिक्षणाचं हब म्हणून ओळखलं ज
नीट परीक्षा


लातूर, 03 मे (हिं.स.)।

डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन हजारो विद्यार्थ्यांची आज धडपड सुरू आहे. देशभरात आज नीट परीक्षेचं आयोजन करण्यात आले असून, लातूर शहरात परीक्षार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.

लातूर हे शिक्षणाचं हब म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे राज्यभरातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande