छ. संभाजीनगर - जिल्हाधिका-यांची औंढा नागनाथ येथे विकास कामांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्ल
अ


छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. कामाची प्रगती, दर्जा आणि नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande