बीड - उमरी बु. ग्रामपंचायतीला शेतकरी संघर्ष समितीने ठोकले टाळे
बीड, 03 मे (हिं.स.)। : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला खरीप हंगामातील हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांचा विमा अद्याप मिळाला नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील उमरी बु. येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ग्रामपंचायरीतीला ''टाळा ठोको'' आंद
बीड - उमरी बु. ग्रामपंचायतीला शेतकरी संघर्ष समितीने ठोकले टाळे


बीड, 03 मे (हिं.स.)।

: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला खरीप हंगामातील हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांचा विमा अद्याप मिळाला नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील उमरी बु. येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ग्रामपंचायरीतीला 'टाळा ठोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

खतगव्हाण, गुंजथडी, आबेगाव, घळाटवाडी, आनंदगाव, ढेपेगाव, उपळी आणि नि. टाकळी यांसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. दिलेल्या निवेदनात म्हटले, की २०२५ मध्ये जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती पाहता राज्य

शासनाने जिल्ह्याला 'स्पेशल केस' घोषित करत अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, घोषणा होऊन अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही. यासंदर्भात यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले होते. विम्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी एक जूनला मोर्चा काढू, पाच जूनला आमदारांच्या घरांसमोर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू, तसेच माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या निवासस्थानावरही मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande