
छत्रपती संभाजीनगर, 03 मे (हिं.स.)।हिमोफिलिया सोसायटीच्या वतीने आयोजित निरंतर वैद्यकीय शिक्षण (CME) व जनजागृती कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिमोफिलिया या आजाराबाबत सखोल माहिती, योग्य उपचारपद्धती आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टींची माहिती दिली.
या उपक्रमामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis