
पुणे, 03 मे (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ ची कामे वेगाने सुरू आहेत. माण-हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
हिंजवडी आयटी हबमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मे अखेरपर्यंत मार्गावरून मेट्रो प्रवासी सेवा करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी १५ मे रोजी ‘टाटा’ आणि ‘पीएमआरडीए’ची उच्चस्तरीय आढावा बैठक होणार आहे. त्यात प्रत्यक्ष कामाचा आढावा घेऊन मार्ग कार्यान्वित करण्याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु